तेर (प्रतिनिधी)-मातंग साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने धाराशिव तालुक्यातील तेर येथील जोशिला लोमटे यांना सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल “साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार 2024“ जाहिर झाला आहे..

समाजातील विविध क्षेत्रातील निष्ठापूर्वक व निरंतर योगदानाबद्दल यंदाचा “साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार 2024“चा पुरस्कार जोशिला लोमटे यांना देण्यात येणार आहे. पुणे येथे पिंपरी चिंचवड या ठिकाणी 'दुसरे मातंगऋषी साहित्य संमेलन' पार पडत आहे. मातंग साहित्य परिषद, पुणे यांच्या माध्यमातून आयोजित या संमेलनात समाजातील विविध घटकांचा अभ्यास करून समाजाप्रती सद्भावना व्यक्त करत मान्यवरांच्या कार्याची दखल घेतली जाते व पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. यावेळी सदर पुरस्कार  जोशिला लोमटे यांना प्रदान करण्यात येत असून शाल, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र अशा प्रकारे पुरस्काराचे स्वरूपाचे आहे. पद्मश्री गिरीश प्रभुणे सर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार असून,  स्वागताध्यक्ष शंकरशेट जगताप, मातंग साहित्य परिषद पुणे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडणार आहे.


 
Top