धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अधिपत्याखाली हिंगोली जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीने औंढा नागनाथ येथे घेण्यात आलेल्या 14 वर्ष वयोगटातील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत कंपाउंड प्रकारात धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचा कंपाउंड धनुर्धर परिस पाटीलने रौप्य पदक पटकाविले आहे.

भारतीय धनुर्विद्या महासंघाच्या अधिपत्याखाली आंध्र प्रदेश धनुर्विद्या संघटनेच्या वतीने विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथे होत असलेल्या 14 वर्ष वयोगटातील राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी परिस पाटील याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. परिस पाटीलने रौप्य पदक पटकविल्या बद्दल धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश गडदे, उपाध्यक्ष अतुल अजमेरा, सचिव तथा मुख्य प्रशिक्षक प्रवीण गडदे, सहसचिव तथा मुख्य प्रशिक्षक अभय वाघोलीकर, कोषाध्यक्ष गुलचंद व्यवहारे, कार्यकारिणी सदस्य डॉ श्रीकांत कवठेकर, सुधीर बंडगर, अनिल जमादार, प्रमुख तथा मुख्य प्रशिक्षक नितीन जामगे, स्पर्धा विभाग प्रमुख तथा मुख्य प्रशिक्षक प्रताप राठोड, कोच अल्लाउद्दीन सय्यद, तांत्रिक समिती सचिव तथा कोच कैलास लांडगे, सह. प्रशिक्षक यशोदीप कदम, सचिन कोकीळ आदींसह संघटनेचे पदाधिकारी, धनुर्धर व धनुर्विद्या प्रेमींनी अभिनंदन केले आहे.


 
Top