तुळजापूर (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे सहकुटुंब दर्शन घेतले. दर्शनानंतर तटकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून तसेच मंदिर संस्थानकडून यथोचित सत्कार करण्यात आला. तटकरे यांचे कुटुंब हेलिकॉप्टरने तुळजापूरमध्ये आले होते.

तटकरे कुटुंबीयांनी शनिवारी सकाळी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मनोभावे दर्शन घेतले.सर्वसामान्य जनतेच्या व बळीराजाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी नांदो अशी प्रार्थना आई तुळजाभवानी चरणी केली.मंदिर समितीतर्फे त्यांचा शाल व तुळजाभवानी देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तटकरे यांच्या पत्नी वरदा, चिरंजीव आमदार अनिकेत तटकरे, स्नुषा आदी उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार,प्रदेश सचिव गोकुळ शिंदे, पक्षाच्या पदवीधर विभागाचे कार्याध्यक्ष नितीन बागल,जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे,तुळजापूर तालुकाध्यक्ष अध्यक्ष सूर्यवंशी तालुका कार्याध्यक्ष संदीप गंगणे,दुर्गेश साळुंखे,पुजारी अविनाश गंगणे व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top