धाराशिव (प्रतिनिधी )अहमदिया मुस्लिम जमातची युवा शाखा मजलिस ख़ुद्दाम-उल-अहमदिया उस्मानाबादच्या वक़ार-ए-अमल विभाग (श्रमाची प्रतिष्ठा) च्या वतीने समाता नगर येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

अहमदिया मुस्लीम जमातच्या सदस्यांव्यतिरिक्त नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनीही सहकार्य केले.स्वच्छता करण्यापुर्वी पवित्र कुराणातील वचनाचे वाचन करण्यात आले,वकार-ए-अमल विभाग व मानव सेवा विभागाच्या वतीने वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रम राबवुन जनहितासाठी झटतात, रक्तदान शिबीर, अन्नदान व थंडीच्या दिवसांत निराधार गरजवंताला गरम रजईचे कपडे दिले जातात आणि हे आम्ही सर्व आपसात करतो, स्वतःच्या मिळकतीतुन असे कार्यक्रम घेतोत असे मनोगत अलीम शेख यांनी व्यक्त केले,यावेळी क्लीन समता ग्रीन समता परिवाराचे संस्थापक श्री नाना घाटगे यांनी पुष्पगुच्छ देऊन ख़ुद्दाम-उल-अहमदिया शहराध्यक्ष व इतर पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले,कार्यक्रमात भारतीय संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले.अहमदिया मुस्लिम जमातने मान्यवरांचे स्वागत इस्लामचा परिचय असलेली पुस्तके आणि पत्रके तसेच जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी अहमदिया मुस्लिम जमातने केलेल्या प्रयत्नांची पुस्तके देऊन स्वागत केले.


या कार्यक्रमात अध्यक्ष अहमदिया मुस्लिम जमात डॉ. बशारत अहमद, ख़ुद्दाम-उल-अहमदिया शहराध्यक्ष राग़ेब अलीम,अन्सार उल्लाह जिल्हाध्यक्ष अब्दुल लतिफ,अन्सार उल्लाह शहराध्यक्ष अब्दुल अलीम, जिल्हाध्यक्ष अहमदिया मुस्लिम जमात तारिक़ अहमद  सादिक, अशोक सावंत (सेवानिवृत्त डेप्युटी सीईओ धाराशिव, सोलापूर), क्लीन समता ग्रीन समता परिवाराचे संस्थापक नाना घाटगे, सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे,महेश काटे, कैलास पानसे, रवींद्र शिंदे, विजय गायकवाड, मच्छिंद्र कदम, पांडुरंग शेरखाने, चिटणीस वक़ार-ए-अमल अब्दुल क़य्युम नासीर तसेच अब्दुस समद,अब्दुल नईम , नदीम अहमद, मुताहिर अहमद, सजील अहमद, आदिल अहमद, तौसीफ अहमद, शफीक अहमद, रोहित अंबलेकर, सूर्यानंद बनसोडे, विश्वजीत बनसोडे, आकाश जानराव,रोहन बनसोडे,परमेश्वर येडे,अजिंक्य शिंदे, किरण गाडे आदी सदस्यांच्या समावेश होता.


 
Top