धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील नामांकित उद्योजक, अक्षय मेटल्सचे मालक  संतोष दत्तात्रय शेटे (वय 51)  यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे.  

रोटरी क्लब उस्मानाबाद मध्ये त्यांनी अध्यक्ष पदासह अनेक पदावर सामाजिक कार्य केले आहे. लघु उद्योग भरतीचे धाराशिव माजी जिल्हा अध्यक्ष, फॅब्रीकेशन क्लस्टरचे संचालक अश्या अनेक पदावर त्यांनी काम केले होते.  संतोष दत्तात्रय शेटे यांनी आपल्या अक्षय मेटल या कंपनीच्या कार्यातून धाराशिव जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र भर ओळख निर्माण केली होती. धाराशिवच्या मधील एक हरहुन्नरी उद्योजक म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे खऱ्या अर्थाने धाराशिवचा हिरा आणि गरिबांचा पोशिंदा आज गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. 
Top