तुळजापूर (प्रतिनिधी)-तुळजापूर तालुक्यातील वडगाव देव येथे मागील आठवड्या पासून नमो चषक अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जय मल्हार क्रिकेट क्लब,वडगांव (देव) आयोजित भव्य खुल्या ग्रामीण क्रिकेट स्पर्धा साखळी पद्धतीने सामने चालू होते.

सदरील आयोजित सामन्यात परिसरातील एकूण 15 संघांनी प्रवेश केला होता.सामन्यातील अंतिम सामना हा नरसिंह क्रिकेट क्लब हिप्परगा (रवा) विरुद्ध जय मल्हार क्रिकेट क्लब वडगाव देव अशी अटीतटीची लढत झाली.

ह्यात नरसिंह क्रिकेट क्लब हिप्परगा (रवा) ह्यांनी बाजी मारली व विजेता संघ ठरला तर उपविजेता संघ वडगाव देव ठरला.यामध्ये पहिल्या संघास रुपये 11000/- सन्मानचिन्ह, ट्रॉफी देण्यात आली तर द्वितीय संघास रुपये 7777/- सन्मानचिन्ह, ट्रॉफी देण्यात आली. या संघाना भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दीपक आलुरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष आनंद कंदले, कार्याध्यक्ष दयानंद मुडके या मान्यवरांच्या हस्ते रोख स्वरुपातील पारितोषक व सन्मानचिन्ह देण्यात आले. प्रसंगी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करुन खेळाच्या बाबतीत प्रोत्साहित केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद राजमाने केले.व आभार प्रदर्शन उमाकांत पाटील ह्यांनी केले. यावेळी बाबासाहेब देवकते, देवबा टकले, विठ्ठल पाटील, विजय गोंगाने, राज पवार, सुपनार अण्णा, विठ्ठल राजमाने, प्रताप पाटील, माधव पाटील, विश्वनाथ देवकते, पांडुरंग सगट, ओंकार सगट, स्वप्नील सगट, बाबुराव कालेकर, बंडू कोरे, धनाजी बनछेडे, कलप्पा कोरे, खेळाडू,ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top