तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद स्पेशल शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमोल थोडसरे यांची निवड करण्यात आली.

प्रशालेचे मुख्याध्यापक ऊत्तरेश्वर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व संजय जाधव, अप्पासाहेब चौगुले, अविनाश आगाशे, खालेद काझी, धनंजय आंधळे,पवण भंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालक सभा घेण्यात आली.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमोल थोडसरे यांची निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी नामदेव कांबळे, पदसिध्द सचिवपदी मुख्याध्यापक ऊत्तरेश्वर राऊत, सदस्यपदी हर्षवर्धन चौगुले, त्रिमूर्ती गायकवाड,प्रेमा नाईकवाडी, शालिनी पांचाळ, शितल सूर्यवंशी, रेश्मा पठाण, भाग्यश्री आंधळे, कालिदास साळुंके, सुरेश नागलबोणे, हिंदवी सौदागर, ओमकार देवकर यांची निवड करण्यात आली.निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.


 
Top