तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राम कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली .                                          

उपाध्यक्षपदी स्वाती  पवार यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली .यावेळी अध्यक्ष व  उपाध्यक्ष यांचा तेर केंद्राचे केंद्रप्रमुख  राजाभाऊ पडवळ, जिल्हा परिषद केंद्रीय प्रशालेचे मुख्याध्यापक गोरोबा पाडुळे, सहशिक्षक अनंत हाके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी नवनाथ पसारे, लखन रसाळ, शंकर थोडसरे व पालक उपस्थित होते. उपस्थित होते.


 
Top