धाराशिव (प्रतिनिधी)- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कसबे तडवळे ता.जि.धाराशिव येथे पहिली महार-मांग वतंदार परिषद 1941 रोजी घेतली होती.या परिषदेचा दि. 22/02/24 रोजी 83 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. 

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी दिलेल्या प्रसिपत्रकात म्हटले आहे की, राज्य सरकारने तात्काळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा व तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी तात्काळ जागा उपलब्ध करून देण्यात यावी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न गेली अनेक वर्षापासून मार्गी लागलेला नाही. राष्ट्रीय स्मारकासाठी निधी पडून आहे. परंतु जागे आभावी अडचण निर्माण झालेली आहे. दरवर्षी या ठिकाणी अनेक आमदार, खासदार, आणि मंत्री आले आणि गेले पण त्यांनी राष्ट्रीय स्मारकाच्या बाबतीत फक्त आश्वासन देणे यांच्या पलीकडे काही केले नाही. म्हणून सर्व समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन तात्काळ हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकत्र येऊन लढा द्यावा. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मुक्काम केला असल्याने त्याच ठिकाणी राष्ट्रीय स्मारक बांधण्यात यावे असे प्रसिद्ध पत्रकात राजाभाऊ राऊत यांनी म्हटले आहे. कसबे तडवळा येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी राजाभाऊ राउत यांच्या सह लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड,साहित्यिक लेखक विजय गायकवाड, बाबासाहेब ओव्हाळ, शाहीर विकास शितोळे, समाधान सरवदे, बबन बनसोडे तानाजी शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top