तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पो हे का गोरख डुलाजी देवकुळे सेवानिवृत्त झाल्या बद्दल पोलिस स्टेशन मध्ये पो नि रविंद्र खांडेकर यांच्या हस्ते  देविची प्रतिमा देवुन फेटा व बुके त्यांना निरोप देण्यात आला.

एपीय विठ्ठल चासकर ऐपीआय मारुती मुंढे ऐपीआय भालेराव पीएसआय राजेंद्र बांगर सह पोलिस कर्मचारी उपस्थितीत होते. पोहैका गोरख देवकुळे तुळजापूर ठाण्यात  पोलिस म्हणून दाखल झाले होते त्यानंतर उमरगा येरमाळा कळंब भूम येथे सेवा करुन तुळजापूर पोलिस ठाण्यात ऐकतीस वर्षाचा निष्कलंक सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले

पञकारांतर्फ निरोप!

तुळजापूर तालुका पञकार संघातर्फ पोहेका गोरख देवकुळे यांचा फेटा बांधुन बुके देवुन सत्कार करुन निरोप देण्यात आला. यावेळी पञकार संघाचे जिल्हा उपाअध्यक्ष श्रीकांत कदम, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, माजी तालुकाध्यक्ष संजय खुरुद, कोषाध्यक्ष सतिश फत्तेपूरे, सुधीर बळवंते सह पञकार पोलिस कर्मचारी यावेळी उपस्थितीत होते.

पोलिस निरीक्षकांचा स्वागता साठी रीघ!

नुतन पोलिस निरक्षक रविंद्र खांडेकर यांनी बुधवार दि 31रोजी पदभार स्विकारला तर गुरुवारी  त्यांच्या स्वागता साठी विविध संघटना पदाधिकारी मान्यवरांची पोलिस स्टेशन मध्ये  दिवसभर रीघ लागली  होती.


 
Top