तुळजापूर (प्रतिनिधी)-  सोलापूर-तुळजापूर रेल्वेच्या कामासाठी रेल्वेने संपादित केलेल्या तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमीनीना कवडी मोल भाव दिला असुन, तरी बाधीत शेतकऱ्यांना योग्य तो मावेजा देण्याच्या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवार दि.6 जानेवारी रोजी जुन्या बसस्थानक चौकात  दुपारी 12.00वा रस्ता रोको करण्याचा इशारा वजा निवेदन तहसिलदार अरविंद बोळंगे यांना दिले.

मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, केंद्र शासनाच्या रेल्वे विभागा अंतर्गत सोलापूर-तुळजापूर रेल्वेच्या कामासाठी तुळजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचे काम चालू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीला देण्यात येणारा मावेजा अतिशय अल्प आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे घरे संसार उदवस्त होणार असुन  अतोनात नुकसान होत आहे. सदर शेतकऱ्यांची जमीन कवडीमोल भावाने घेऊन शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. अशा देशामध्ये सदरील गोरगरीब शेतकऱ्यावर अन्यायी मार्गाने व अतिशय तुटपुंजा भाव देऊन शासन जमिनी घेत आहे त्यामुळे या शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ शासन शेतकऱ्यावर आणत आहे. सदर संपादित क्षेत्राचा योग्यतो मावेजा शेतकऱ्यांना देण्यात यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरेल व सदर रेल्वेचे कोणतेही काम होवु देणार नाही याची नोंद घ्यावी. तरी आपण स्वत; या संदर्भात लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या जमीनीला योग्य तो मोबदला देण्यासाठी संबंधित रेल्वे विभागाला निर्देश द्यावेत व शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तुळजापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

सदरील निवेदन स्वाभीमानी शेतकरी संघटना जिल्हाअध्यक्ष रविंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली अशोक व्यवहारे, सतिश बेले, वैजीनाथ बेले, लखन गुंड, शाहुराज चव्हाण, भागवतराव नेपते, कचरुद्दीन शेख, शंकर गुंड, अर्जुन सांळुके, सूरज बागल, धीरज बागल, शितल बागल, जिवन बागल, अभय बागल, सतिश भोसले, दिपक चंदनशिवे, बालाजी बेले, मधुकर गुंड, सिंहल गुंड, प्रविण कदम, भिभराव चव्हाण, चंद्रकांत सांळुके अदि उपस्थितीत होते.


 
Top