तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील भवानी  रोड -आर्य चौक- किसान चौक  या 12 मीटर रस्ता रुंदी करण्यास  तब्बल चौदा वर्षानंतर भूसंपादानास  शासनाने मंजुरी दिल्याने गेली  14वर्षापासुन वनवासात राहिलेल्या  या रस्ताचा वनवास संपुष्टात येणार  आहे.

विशेष म्हणजे हा रस्ता भवानी रोड ते शुक्रवार पेठ या रस्ताला समांतर असणारा रस्ता असल्याने भवानी  रस्त्यावर होणारी गर्दी  जवळपास तीस ते पसतीस टक्के या रस्त्यावरून जाणार असल्याने भवानी रोडवरील गर्दी कमी होवुन याचा लाभ भाविकांना होणार आहे.

भवानी रोड आर्य चौक  ते किसान चौक हा रस्ता तुळजापूर विकास प्राधिकरणातुन करण्यात येणार होता. माञ भूसंपादना बाबतीत वाद निर्माण झाल्याने या रस्ताचे काम रखडले होते. माजी मंञी माजी आ. मधुकर चव्हान यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या रस्ता काम मंजुरीसाठी तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुरावाला यश आले असून. सदरच्या रस्त्याची भूसंपदाची प्रक्रिया यापुढे करणे सुलभ होईल व तुळजापूर शहरातील मध्यवर्ती व महत्त्वाचा ठिकाणी होणाऱ्या रस्त्यापैकी एक असा रस्ता आहे. या रस्ता रखडत असल्याने  शहरवासियांना प्रचंड ञास होत होता. या रस्तामुळे भाविकांसह शहरवासियांचे गैर सोय दूर होणार आहे. त्यामुळे शहराच्या विकासात भर पडणार आहे व येणाऱ्या भाविकांना मूलभूत व पायाभूत सुविधा सहज उपलब्ध होणार आहेत. नगरपरिषद अंतर्गत भवानी रोड आर्य चौक किसान चौक 12 मीटर रुंद रस्त्याचे भूसंपादन बाबीचे नावातील दुरुस्ती बाबतचे राज्यपत्रातील शुद्धीकरण करण्यास महाराष्ट्र शासनातर्फे मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सदरच्या रस्त्याचे भूसंपादन प्रक्रियेतील कारवाईस गती येणार आहे.


 
Top