उमरगा (प्रतिनिधी)-तालुक्यातील वागदरी येथील स्नेहा राजाराम गायकवाड या विद्यार्थिनीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 2022 ला घेण्यात आलेल्या राज्य विक्रीकर निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. सोमवारी (दि 5)रोजी हा निकाल जाहीर करण्यात आला असून तिच्या उज्वल यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

स्नेहाचे आई वडील व्यवसाय करण्याच्या निमित्ताने पुण्यात राहायला गेले. त्यामुळे तिचे शिक्षक पुण्यात पूर्ण झाले. तीने मॉडर्न कॉलेजमध्ये एमसीएस (कॉम्प्युटर सायन्स) चे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागली. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र यात खचून न जाता स्नेहा ने जोर लावून अभ्यास केला. महान व्यक्तीचे पुस्तके वाचून प्रेरणा घेतली. अभ्यास करू लागली, कोणताही क्लास नाही किंवा कोणते प्रशिक्षण नाही केवळ घरी बसून अभ्यास करणे, त्यातच घरी अभ्यासात व्यत्यय येऊ लागल्यामुळे बाहेर ग्रंथालयात जाऊन अभ्यास करू लागली. पहाटे लवकर उठणे आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून तिने हे यश प्राप्त केले आहे. तिच्या यशाने आई वडिलांच्या कष्टाचे चीज झाले आहे. आई वडिलांसह स्नेहाचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.


 
Top