परंडा (प्रतिनिधी) - परंडा येथील शासकीय विश्राम गृह येथे डी.बी.ए समूहाच्या वतीने 127 वी त्यागमूर्ती  माता रमाई यांची जयंती बुधवार दि. 7 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली. 

यावेळी डी.बी.ए समूह  संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे,  राष्ट्रवादी सामाजिक  न्याय विभाग जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा सरचिटणीस  मोहन बनसोडे, माजी नायब तहसीलदार अण्णासाहेब बनसोडे, महात्मा फुले समता परिषद जिल्हा अध्यक्ष बिभीषण खुणे स, बुद्धाचार्य दिलीप परिहार यांनी सामुदायिक त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेचे दीप धूप प्रज्वलन करून पूजा केली. यावेळी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनावर माऊली शिंदे (वाकडी) यांनी गीत गायले, एड. दयानंद घेंडे, मनोज सिंगनाथ, दशरथ मारकड, महावीर बनसोडे, दयानंद बनसोडे, यांनी विचार मांडले. यावेळी अमर गायकवाड, दिलीप परिहार, लहू काटवटे, गणेश इथापे, सिद्धार्थ शिंदे, आशुतोष बनसोडे, नागेश थोरात, भीम शिंदे,संदिपान कांबळे व महिला लक्ष्मीबाई जाधव, आरती बनसोडे, सुषमा बनसोडे, संगीता बनसोडे, संगीत थोरात, सुजाता साळवे, इत्यादी महिला व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होत्या शेवटी आभार प्रदर्शन दयानंद बनसोडे यांनी मांडले.

 

 
Top