धाराशिव (प्रतिनिधी)-प्रत्येक पालक व विद्यार्थी याचा संवाद शिक्षकासोबत व्हावा असे मत आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांचे होते. त्यांच्या सूचनानुसार प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य साहेबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान विभाग यामध्ये अकरावी वर्गाचा पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.

सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे स्पर्धेच्या युगात मध्ये टिकायचा असेल तर आपली गुणवत्ता सिद्ध करावे लागेल असे प्रतिपादन कॉलेजचे उपप्राचार्य संतोष घारगे यांनी पालक मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांना केले. त्यानंतर श्रीपतराव भोसले ज्युनियर सायन्स कॉलेजमध्ये चालणाऱ्या फोटॉन बॅच व फिनॉमिनल बॅच या बॅचचे   प्रमुख प्रा.अरविंद भगत यांनी माहिती दिली. त्यानंतर पालकांच्या काही सूचनावरती निरसन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. तानाजी हाजगुडे यांनी केले.

अध्यक्ष समारोप प्रा. मोमीन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वर्ग शिक्षक प्रा. प्रसाद माशाळकर यांनी केले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 
Top