तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील कसई शिवारातील रूपा पेट्रोल पंपा जवळ दोन मोटार  सायकल मध्ये  समोरासमोर अपघात होवुन यात  दोन्ही मोटार सायकलचे चालक जागी ठार झाल्याची घटना बुधवार दि 6 फेब्रुवारी रोजी सांयकाळी सात वाजता घडली.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, तुळजापूर  वरून मोटरसायकल क्रमांक एमएच 14 एच 1481 या क्रमांकाच्या गाडीवरून स्वतःच्या गावी येवती येथे जात असताना. तर कसई येथुन तुळजापूरकडे येणारी मोटर सायकल एमएच13 बीयु 9014 या दोन्ही गाड्या रूपा पेट्रोल पंप जवळ आल्या असता दोन्ही मोटरसायकलचे समोरासमोर जोराची धडक बसली. यात रामचंद्र बलभीम भरगंडे रा. येवते वय 32 व शिवराम सुभाष मारकड वय 40  वर्षी रा. यमगरवाडी ता. तुळजापुर हे जागीच ठार झाली. तर आप्पा जाधव वय 28 वर्ष  रा. येवती हे गंभीर जखमी झाले. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.



 
Top