तुळजापूर (प्रतिनिधी) - छञपती शिवाजी महाराज वीर थे हम रोज उनका नाम लेके काम करना शुरुवात करते है| शिवाजी वीरों की माता माँ तुलजा भवानी के दर्शन के लिये जलदी जरुर आयेगे असे उदगार उत्तरप्रदैश के मुख्यमंञी योगी यांनी श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्ताने अयोध्येत गेलेले महंत तुकोजी बुवा यांच्या सोबत बोलताना म्हणाल्याचे सांगितले.

तिर्थक्षेञ तुळजापूर येथील महंत तुकोजीबुवा, महंत मावजीनाथ, महंत सोमवार गिरी हे श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास अयोध्येत गेले होते. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर मुख्यमंत्री योगी यांच्याशी भेट झाली. यावेळी आपली माहिती देताना महंत तुकोजीबुवा म्हणाले कि, हम महाराष्ट्र के छञपती शिवाजी महाराज को उनकी कुलस्वामिनी तुलजाभवानी मातेने तलवार दियी थी उनके हम महंत है असे सांगुन त्यांना देविच्या चरणाचे कुंकु लावुन कवड्याची माळ दिली. असता ते म्हणाले कि हम रोज छञपती शिवाजी महाराज का नाम लेते है उनकी कुलस्वामिनी माँ तुलजाभवानी माता का दर्शन के लिये जल्दी जरुर आयेगे असे यावेळी सांगितले. तुळजाभवानी कवडीच्या माळेचा सन्मानपुर्वक स्विकारली.


 
Top