धाराशिव (प्रतिनिधी)- कौटुंबिक न्यायालय, धाराशिव येथे 6 व्या वर्धापन दिनानिमित्त नुकतीच कायदेविषयक मार्गदर्शन व विवाहपूर्व समुपदेशन कार्यशाळा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती आर.व्ही.मोहिते होत्या.प्रमुख अतिथी म्हणून माजी व्यवस्थापक तथा महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ऍड.एम.एस.पाटील आणि जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष  ॲड. रवींद्र कदम यांची उपस्थिती होती.

न्या.श्रीमती मोहिते यांनी कौटुंबिक न्यायालयातील कायदेविषयक तरतुदीबाबत तसेच मागील वर्षाभराच्या कौटुंबिक न्यायालयाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. तर ॲड.पाटील आणि ऍड. कदम यांनी कौटुंबिक कायद्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये विवाह समुपदेशक एस.डी मोरे यांनी विवाहपूर्व समुपदेशनाबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला डॉ.बापूजी साळुंके विधी महाविद्यालय,अध्यापक विद्यालय,व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय,श्रीमती सुशीलादेवी साळुंके कॉलेज ऑफ एज्युकेशन येथील प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.तसेच कौटुंबिक न्यायालयाचे सर्व कर्मचारी व विधीज्ञ उपस्थित होते.उपस्थितांचे आभार आर.एस.मेंढापुरकर यांनी मानले.


 
Top