तुळजापूर (प्रतिनिधी)-  तिर्थक्षेञ तुळजापूरात लातुर रस्त्यावर असणाऱ्या नव्या बसस्थानकात चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. पाच दिवसात सोलापूरच्या दोन  महिलांचे गळ्यातील 3 लाख 20 हजार  किमतीचे सोन्याचे दागिने बसमध्ये चढताना चोरुन नेल्याची घटना घडली आहे. हे दोन्ही गुन्हे गर्दीच्या दिवशी बसस्थानकात बसमध्ये चढताना घडले आहेत. हे गुन्हे एकाच पध्दतीने झाल्याने महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बसमध्ये चढत असताना चोरुन नेणाऱ्या चोरट्यांची टोळी येथे कार्यरत असल्याचे असल्याचे दिसुन येत आहे.

यापुर्वी गुरुवारी दि. 25 जानेवारी रोजो  पोर्णिमा दिनी नंतर मंगळवार दि. 30 जानेवारी रोजी गर्दी दिनी चोरांची घटना घडल्याने महिला भाविकांमध्ये घबराहाटीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही महिला सोलापूरच्या असुन एकीची 1 लाख 80 हजार तर आता दुसऱ्या महिलेचे गळ्यातील 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे दागदागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने महिला भाविक प्रवासी यांच्या दागदागिने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सध्या जुने बसस्थानक बांधकाम सुरु असल्याने नव्या बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. याचाच लाभ घेत खास करुन चोरट्यांनी महिलांचा दागदागिन्यांवर आपले लक्ष केंर्दित केले आहे.


 
Top