धाराशिव (प्रतिनिधी)-फिर्यादी विजयकुमार विठ्ठल देशमुख रा. केशवनगर, धाराशिव यांना 29 ऑगस्ट 2023 रोजी घरात वापरायचे फर्निचर स्वस्तात विकणे आहे अशी मित्राने त्यांचे फेसबुक खात्याचे मेसेंजरवर सांगितल्याने फिर्यादींनी फर्निचरसाठी मित्राने पाठवलेल्या मेसेजवर विश्वास ठेवत त्यांनी पाठवलेल्या क्युआर कोडवर 25 हजार पाठवले. परंतु त्यांना सदर फर्निचर हे मिळाले नसल्याने त्यांची फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विजयकुमार देशमुख यांनी सायबर पोलिस ठाण्यात सदर घटनेबाबत फिर्याद दिल्याने 16 ऑगस्टला गुन्हा दाखल झाला आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सायबर पोलिस ठाणे बबीता वाकडकर, महिला पोलिस अमंलदार व्हंदरगुंडे सह सायबर पोलिस ठाण्याचे पथक यांनी नमूद गुन्ह्याचे तपासात तांत्रिक विश्लेषण करून तसेच आरोपीचे बँक खात्यांची माहिती घेवून फिर्यादी यांनी पाठवलेले 25 हजार रूपये रक्कम होल्ड करून सदर रक्कम ही न्यायालयाचे आदेशावरून फिर्यादीस परत करण्यात यश मिळवले आहे. 


 
Top