धाराशिव (प्रतिनिधी)- खेलो इंडिया विंटर गेम्स आईस हॉकी स्पर्धेसाठी धाराशिव जिल्हा आईस हॉकी संघटनेचे अभिजीत कंदले, अजिंक्य जाधव, अमित बहिरे, उत्कर्ष होनमुटे व साई राठोड यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने खेलो इंडीया कार्यक्रमांतर्गत लेह, लद्दाख येथे या स्पर्धा होत असुन महाराष्ट्राच्या संघात सर्वाधिक धाराशिव जिल्ह्यातील 5 खेळाडुंचा समावेश झाला आहे. दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि धाराशिव जिल्हा आईस हॉकी संघटनेच्या वतीने धाराशिव येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे व जिल्हा आईस हॉकी संघटनेचे अध्यक्ष धिरज पाटील यांच्या हस्ते अभिजीत, अजिंक्य, अमित, उत्कर्ष, साई यांना गौरविण्यात आले. यावेळी क्रीडा अधिकारी बी. के. नाईकवाडी, जिल्हा आईस हॉकी संघटनेचे सचिव प्रतापसिंह राठोड, प्रशांत पटिल, अग्निवेश शिंदे, अभिजीत साळुंखे, वैभव पाटील, कैलास लांडगे, यशोदिप कदम आदिंसह पालक खेळांडुची प्रमुख उपस्थिती होती.


 
Top