भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील शेखापूर येथील हजरत गैबी पीर बाबा रहिमुतुल्ला आलेह यांच्या संदल उर्स निमित्त कव्वाली कार्यक्रमाचा आस्वाद मौजे शेखापुरकरांनी घेतला.

सालाबाद प्रमाणे मौजे शेखापूर येथील दर्गा कमिटी यांच्या वतीने संदल मिरवणूक व उर्स कमिटी, केजीन ग्रुप व मोईज सय्यद मित्र मंडळाच्या वतीने कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी कव्वाल शाहेद अजमेरी व कव्वाला परविन अजमेरी यांचा कव्वालीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोईज सय्यद, सादिक शेख, ताहेर पटेल, साहेबराव हांडे, अमर बादेला, मुशरफ सय्यद, युसुफ सय्यद, शाहरुख पठाण जमादार शेख, आदम सय्यद, आयसल शेख, वसीम सय्यद यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी मुस्लिम बांधवासह हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top