धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी  20 लक्ष 4 हजार 282 मतदार मतदानाचा  हक्क बजावणार आहे.  यामध्ये 10 लक्ष 58 हजार 156 पुरुष, 9 लक्ष 46 हजार 48 स्त्री तर 78 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यामध्ये जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, धाराशिव, परंडा, लातूर जिल्ह्यातील औसा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. 

मतदान प्रक्रियेसाठी या सहा विधानसभा मतदारसंघात 2139 मतदान केंद्र राहणार आहे. यामध्ये औसा विधानसभा क्षेत्रात 307 मतदान केंद्र राहणार असून 1 लक्ष 69 हजार 614 पुरुष, 1 लक्ष 50 हजार 471 स्त्री  व 3 तृतीयपंथी असे एकूण 3 लक्ष 20 हजार 88 मतदार, उमरगा विधानसभा क्षेत्रात 315 मतदान केंद्र असून 1 लक्ष 63 हजार 730 पुरुष, 1 लक्ष 45 हजार 301 स्त्री व 10 तृतीयपंथी असे 3 लक्ष 9 हजार 41 मतदार, तुळजापूर विधानसभा क्षेत्रात 406 मतदान केंद्र असून 1 लक्ष 96 हजार 902 पुरुष, 1 लक्ष 75 हजार 388 स्त्री व 6 तृतीयपंथी असे एकूण 3 लक्ष 72 हजार 296 मतदार,  धाराशिव विधानसभा क्षेत्रात 410 मतदान केंद्र असून 1 लक्ष 90 हजार 662 पुरुष, 1 लक्ष 70 हजार 780 स्त्री व 16 तृतीयपंथी असे 3 लक्ष 61 हजार 458 मतदार, परंडा विधानसभा मतदारसंघात 372 मतदान केंद्र असून 1 लक्ष 72 हजार 531 पुरुष, 1 लक्ष 51 हजार 390 स्त्री व 6 तृतीयपंथी मतदार अशी एकूण 3 लक्ष 23 हजार 927 मतदार आणि बार्शी विधानसभा क्षेत्रात 329 मतदान केंद्र असून 1 लक्ष 64 हजार 717 पुरुष, 1 लक्ष 52 हजार 718 स्त्री आणि 37 तृतीयपंथी असे एकूण 3 लक्ष 17 हजार 472 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये 71 मॉडेल मतदान केंद्र राहणार आहे. यामध्ये औसा विधानसभा क्षेत्रात 1, उमरगा 17,  तुळजापूर 17,  धाराशिव 17, परंडा 17 आणि बार्शी  विधानसभा क्षेत्रात 2 मतदान केंद्राचा समावेश आहे. संवेदनशील मतदान केंद्रामध्ये 1 औसा, 1 उमरगा, 2 तुळजापूर, 2 धाराशिव, 1 परांडा व 1  बार्शी अशा एकूण 8 मतदान केंद्राचा समावेश आहे.  ज्या मतदान केंद्रावर सर्व मतदान अधिकारी-कर्मचारी ह्या महिला असतील असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 1 मतदान केंद्र हे महिला अधिकारी कर्मचारी हे मतदान प्रक्रियेचे काम पाहतील. तर ज्या मतदान केंद्रावर पूर्णत: युवा अधिकारी-कर्मचारी काम पाहतील त्यामध्ये सहाही विधानसभा क्षेत्रामध्ये  प्रत्येकी एक याप्रमाणे अशा एकूण 6 मतदान केंद्राचा समावेश आहे. दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांकडून 10 मतदान केंद्र संचालीत केले जातील. यामध्ये औसा विधानसभा क्षेत्रात 5, उमरगा, तुळजापूर, धाराशिव, परंडा व बार्शी या विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी 1 केंद्र दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून चालवले जातील.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश असून यामध्ये 2139 मतदान केंद्र राहणार आहे. यामध्ये औसा विधानसभा क्षेत्रात 307, उमरगा 315, तुळजापूर 406, धाराशिव 410, परंडा 372 आणि बार्शी 329 असे एकूण 2139 मतदान केंद्र राहणार आहे. औसा विधानसभा क्षेत्रात 1473, उमरगा विधानसभा क्षेत्रात 1512, तुळजापूर विधानसभा क्षेत्रात 1948, धाराशिव  विधानसभा क्षेत्रात 1968, परंडा विधानसभा क्षेत्रात 1785 आणि बार्शी  विधानसभा क्षेत्रात 1580 असे एकूण 10 हजार 266  मतदान निवडणूक अधिकारी व कर्मचारी या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेचे काम पाहतील. 

या लोकसभा मतदार संघासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान कर्मचारी व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी, उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले, प्रशिक्षण व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी श्री उदयसिंह भोसले, साहित्य व मागणी वितरणचे नोडल अधिकारी  म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, वाहन व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी  म्हणून उपजिल्हाधिकारी  संतोष राऊत, संगणक सुरक्षा आयटी एप्लीकेशन कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे, मतदान जनजागृती कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुधा साळुंखे, कायदा व सुव्यवस्था व सुरक्षा नियोजन कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी शोभादेवी जाधव, ईव्हीएम मशीन व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  विलास जाधव,  खर्च व नियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून जि.प.चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी एस. एस.इगे, टपाली मतपत्रिका व छपाई कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर, माध्यम व सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, समन्वय कक्षाचे नोडल अधिकारी  म्हणून जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  डि.एम.गिरी, मतदारयादी कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव,  तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष व नियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, निवडणूक निरीक्षक व इतर अनुषंगिक व्यवस्था कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, नामनिर्देशन कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी  शिवाजी  शिंदे, सी-व्हिजिल कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून महसूलचे तहसीलदार प्रवीण पांडे, दिव्यांग मतदार मदत व  सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.एम. गिरी,  अवैध दारू वाटपास प्रतिबंधक कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे, विविध परवाने व चौकशी कक्षाचे  (एक खिडकी) नोडल अधिकारी  म्हणून तहसीलदार प्रवीण पांडे, प्रथमोपचार सोयी-सुविधा पथक/वैद्यकीय पथकाचे नोडल अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालयाचे  प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आय.जी. मुल्ला, स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राच्या कक्षाचे व्यवस्थापन नोडल अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी शिवाजी  शिंदे, ओळखपत्र तयार करणे व वाटप कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे हे काम पाहतील.

धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी भरारी पथके, तपासणी पथके व चित्रीकरण पथके निश्चित करण्यात आली आहे. 80 वर्षांवरील जे मतदार व दिव्यांग मतदार मतदान केंद्रात जाऊन मतदान करु शकणार नाहीत अशा मतदारापर्यंत मोबाईल मतदान केंद्राच्या माध्यमातून मतदान करता येईल. त्यासोबत मतदान निवडणूक चमू आवश्यक त्या सुरक्षेसह ही मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. 18 ते 19 वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांची संख्या 86 हजार आहे. हे मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. आताही 18 वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांना मतदार व्होटर लाईन, तहसील कार्यालय, केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांच्याकडून मतदार नोंदणी करता येणार असल्याची माहिती डॉ.ओम्बासे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  


 
Top