भूम (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य बाळासाहेब क्षिरसागर यांच्याकडे पक्षश्रेष्ठींनी भूम, परंडा, वाशी विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असून नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष यांनी त्यांना सुपूर्द केले आहे. या निमित्ताने त्यांचा धाराशिव येथील पक्ष कार्यालयात सत्कार करून शुभेच्छा दिल्या. भूम तालुक्यातूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बांधली जोरात सुरू आहे. यातच केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबवलेल्या कल्याणकारी योजना घरोघरी पोहोचवण्याच्या अनुषंगाने गाव चलो अभियान सुरू आहे. याच दरम्यान पक्षश्रेष्ठींनी जुन्या आणि नवीन पदाधिकाऱ्यांचा एकत्रित समन्वय साधून मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. यामध्ये गाव चलो अभियानची जबाबदारी पक्षाचे ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील यांच्याकडे दिली आहे. तर 1 फेब्रवारी 2024 रोजी भूम, परंडा, वाशी विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी ज्येष्ठ नेते बाळासाहेब क्षिरसागर यांच्याकडे दिली आहे. या निमित्ताने त्यांचा धाराशिव येथे पक्ष कार्यालयात आमदार राणाजगजितसिंह पाटील,  जिल्हाध्यक्ष संताजी चालूक्यसह अनेकांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.

भूम तालुक्याच्यावतीने प्रदेश सदस्य जालिंदर मोहिते वालवड, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील माणकेश्वर, तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर,  उपाध्यक्ष हेमंत देशमुख, शिवाजी ऊगलमुगले, कामगार मोर्चा भूम तालुका अध्यक्ष सचिन बारगजे, भूम शहराध्यक्ष बाबासाहेब बीर, बाजार समिती संचालक अंगद मुरूमकर,  विकास जालन, अमोल बोराडे, तालुका प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, माजी नगरसेवक रोहन जाधव, मिडिया विभाग मुकुंद वाघमारे, शांतीलाल बोराडे, सुहास बुरटे, देवळाली अ ज तालुकाध्यक्ष प्रदीप साठे,  उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष चंद्रकांत गवळी, प्रकोष्ठ अध्यक्ष विधिज्ञ संजय शाळु , ग्रा.प. ईडा सदस्य लक्ष्मण भोरे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष स्वाती तनपुरे,  माजी महिला तालुकाध्यक्ष लता गोरे हिवर्डा, माजी पंचायत समिती उपसभापती काकासाहेब चव्हाण, राजसिंह पांडे,  रोहिदास भोसले, संजय जगदाळे, श्रीपाद देशमुख, बाबुराव खरात, मारुती चोबे, संतोष अवताडे, चंद्रकांत मासाळ, किरण कुलकर्णी, बाबासाहेब गीते आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


 
Top