भूम (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकास अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती धाराशिव मार्फत सदरचा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा पुरस्कार भूम येथील श्री गुरुदेव दत्त हायस्कूलचे पर्यवेक्षक सतीश देशमुख यांना जाहीर करण्यात आला. काल छत्रपती शिवाजी हायस्कूल बलसुर तालुका उमरगा येथे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते सदर पुरस्कार देशमुख यांना देण्यात आला. सतीश देशमुख यांना सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल हायस्कूल मधील सर्व शिक्षकाकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.


 
Top