धाराशिव (प्रतिनिधी)- सरपंचाची कर्तव्य पार पडताना कसुर केल्याचा ठपका ठेवत कळंब तालुक्यातील चोराखळी येथील माजी सरपंचाचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांनी हे आदेश दिले असून खंडेराव मैंदाड हे अपात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे श्री. मैंदाड यांनी यापूर्वीच आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता त्यांचे ग्रामपंचायत सदस्य पदही गेल्याने खळबळ उडाली आहे. तक्रारदार ॲड. मिराजी मैंदाड यांच्या वतीने ॲड. सुशांत चौधरी व ॲड. सुजित पाटील यांनी बाजू मांडली. 

याबाबत ॲड. सुशांत चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील चोराखळी येथील सन 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत खंडेराव एकनाथ मैंदाड हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडूण आले. तसेच ते ग्रामपंचायत चोराखळीचे सरपंच म्हणून निवडूण आले. त्यांनी 2020-2023 पर्यंत ग्रामपंचायत चोराखळीचे सरपंच पद भूषविले. सदरील कार्यकाळात सरपंच म्हणून कायदयाने निर्देशित केलेले कर्तव्य पार पाडण्यात कसुर केला, म्हणून माजी सरपंच ॲड मिराजी मैंदाड यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) नुसार कारवाई करण्यासाठी तक्रारी अर्ज दाखल केला. सदर तक्रारी अनुशंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, धाराशिव यांच्या तर्फे चौकशी होऊन सदरील चौकशी अहवाल विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे योग्य त्या कारवाईस्तव सादर केला. 

सदर अहवालाच्या अनुशंगाने विभागीय आयुक्त यांनी सरपंच खंडेराव मैदाड व तक्रारकर्ते ॲड. मिराजी मंदाड यांनी नोटीस बजावली असता तक्रारकर्ते अँड मिराजी मैंदाड यांच्यातर्फे ॲड सुशांत चौधरी व अँड सुजीत पाटील यांनी लेखी तसेच तोंडी युक्तीवाद करुन सरपंच यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांचे कर्तव्य पार पाडलेले नसून बऱ्याच कामात अनियममता केलेली असल्यामुळे व ते चौकशी अंती सिद्ध झाल्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) नुसार सदस्य सरपंच किंवा उपसरपंच यांनी अनियमता केलेली असेल तर त्यांना पदावरुन निष्काशित करण्यात यावे असा युक्तीवाद सादर अधिनियम 1958 चे कलम 39 (2) आणि कलम 39 (1) अन्वये दोषी आढळल्यामुळे केला. सरपंचाच्या वतीने असा युक्तीवाद करण्यात आला की त्यांनी 17 ऑगस्ट 2023 रोजी सरपंच पदाचा राजीनामा दिलेला असून सध्या ते फक्त सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करता येणार नाही. तक्रारकर्ता व सरपंच दोन्हींची बाजु ऐकून घेऊन विभागीय आयुक्त यांनी खंडेराव मैदाड यांनी जरी सरपंच पदाचा राजीनामा दिला असला तरी ते महाराष्ट ग्रामपंचायत त्यांना ग्रामपंचायत चोराखळी सदस्या पदावरुन उर्रवरित कालावधीसाठी अपात्र घोषीत केले. मुळ तक्रारदार ॲड. मिराजी मैदाड यांच्या वतीने ॲड. सुशांत चौधरी व ॲड. सुजीत पाटील यांनी बाजू मांडली, चोराखळीचे माजी सरपंच खंडेराव मैदाड यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.


 
Top