धाराशिव (प्रतिनिधी)- सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील रेशनचा तांदूळ साठवून काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी जाताना पोलिसांना आढळल्याने दोघांवर धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

छोटा हत्ती क्र. एमएच 25 पी 1723 व पिकअप क्र. एमएच 14 जीडी 2901वाहनामध्ये अंदाजे 1 लाख 75 हजार रूपयांचा 146 तांदळाचे पोते, रिकामे सुतळीचे 49 पोते असा एकूण 11 लाख 75 हजारांचा माल आढळला. सतीश शितोळे रा. रामनगर, धाराशिव, इम्रान सलाउद्दीन शेख रा. समर्थनगर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
Top