धाराशिव (प्रतिनिधी)- तलाठी परिक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी तरूणांकडून सातत्याने केल्या जात होत्या. काही जिल्ह्यात असे प्रकार समोर आल्यानंत गुन्हे ही नोंद झाले होते. रिमोट कॉम्प्युटर ऑपरेट करून पेपर सोडवल्याप्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात 9 जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

तलाठी परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतल्याने तरूणांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. परीक्षा सुरू असतानाच परिक्षेत गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. काही जिल्ह्यात गुन्हे ही नोंद झाले होते. धाराशिव येथेही परिक्षेत अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी धाराशिवचे तहसीलदार निलेश काकडे यांनी आनंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अहमदपूर तालुक्यातील होटाळा येथील मयुर श्रीहरी दराडे,लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील प्रमोद रामराव केंद्रे, सचिन मुळे, राजू कांबळे अन्य 5 व्यक्तीविरूध्द आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. यातील मयुर दराडे व प्रमोद केंद्रे यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. तलाठी घोटाळ्यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. उर्वरित आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.


 
Top