तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी अंबड  तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा  योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या  समर्थनार्थ, सगेसोयरे अधिसूचनेचा कायदा करणेसाठी आणि सध्या त्यांची ढासळलेली प्रकृती व मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला.  तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बुद्रुक), तीर्थ (खुर्द) व बिजनवाडी या तीन गावातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने शनिवारी दि. 17 फेब्रुवारी रोजी  सकाळी 9 ते 11 या कालावधीत नळदुर्ग - तुळजापूर रस्त्यावरील तीर्थ बुद्रुक येथील रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे  दोन तास चाललेल्या या रस्ता रोको आंदोलनामुळे नळदुर्ग - तुळजापर या दोन्ही बाजूने जवळपास पाच किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने चक्काजाम  झाले होते.

जवळपास दोन तास चाललेल्या रस्ता रोकोमुळे पाच किलोमीटर चक्काजाम झाले होते. यावेळी मराठा बांधवांच्या वतीने शासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.

या आंदोलना दरम्यान आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणांनी  तीर्थ बुद्रुक परिसर दणाणून गेला होता. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तुळजापूर पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

सकल मराठा समाजाच्या वतीने तब्बल दोन तासानंतर तहसीलदार अरविंद कोळंबे यांचेकडे लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी असे निवेदन देऊन आंदोलन शांततेत स्थगित केले. यावेळी तीर्थ (बुद्रुक), तीर्थ (खुर्द) व बिजनवाडी येथील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top