भूम (प्रतिनिधी)- अवैद्य गावठी दारू बनवणाऱ्या 11 ठिकाणी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्यासह टीमने मोठी कारवाई करून एक लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून नष्ट करण्यात आला .
अधिक असे की, फिर्यादी सुनील अंकुश लोहार पोलीस कॉन्स्टेबल 1718 यांच्या फिर्यादीवरून भूम शहरात सकाळी 9.32 वाजण्याच्या सुमारास अवैध धंदे व मास रेड कामी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, स.पो.नी तवार उप पोलीस निरीक्षक सरोदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधवर, पोलीस नाईक पौळ, पोलीस कॉन्स्टेबल लोहार, पोलीस कॉन्स्टेबल बाराते, डोके आधी कर्मचाऱ्यांनी मिळून ही कारवाई केली असल्याचे माहिती मिळाली आहे.