परंडा (प्रतिनिधी) -मुस्लिम समाजातील ज्येष्ठ महिला हाज्जन रजिया सुलताना ( गुलशनबी ) मोहम्मद इद्रिस चौधरी ( वय 82 ) यांचे रविवारी दि.11 रोजी रात्री राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नगरसेवक ॲड. नुरुद्दीन चौधरी, भारतीय जनता पार्टीचे ॲड.जहीर चौधरी, डॉ.तनवीर चौधरी यांच्या त्या आई होत. 

त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी 11.30 वाजता हजरत ख्वाजा खलील ख्वाजा मोतीसाब दर्गा कब्रस्तानात दफनविधी करण्यात आले. यावेळी सर्व स्तरातील प्रतिष्ठीत नागरिक, व्यापारी, राजकीय कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात सहा मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.


 
Top