परंडा ( प्रतिनिधी) - कर्मवीर मामासाहेब जगदळे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमिताने कर्मवीर परिवाराच्या वतीने जि.प. प्रशाला जवळा 

(नि.) तालुका परंडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून गेली दहा वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.

या शिबिराचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी चे सेक्रेटरी जय कुमार बापू शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, विस्तारअधिकारी शिवाजी काळे, अशोक खुळे, सूर्यभान हाके, सोमनाथ टकले, अशोक तात्या गवारे, परसु गवारे, बाबासाहेब गवारे, दिगंबर मोहिते हे होते. रक्तदान चळवळ ही लोक चळवळ व्हावी म्हणून जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान जवळा नि, भक्ती शक्ती सार्वजनिक शिवजयती मंडळ गावातील या संस्थेनेही पुढाकार घेतला. रक्तदाब, हिमोग्लोबिन तपासणी करून महिलांनी उत्सफूर्तपणे सहभाग घेत 47 महिलांनी व 104 पुरुषानीं सहभाग घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याण तांबे,शिवाजी वाघमारे,महेश शिंदे,संतोष तोडकरी,ज्ञानेश्वर कातूरे, रामदास होरे, महादेव विटकर,,नागनाथ गटकळ,संतोष बरचे आश्रु कातुरें यांनी विशेष परिश्रम घेतले.श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी बार्शीचे कर्मचारी यांनी योग्य नियोजन केले.


 
Top