तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी व बारावी परीक्षा 2023 मधील गुणवंत विद्यार्थी व विविध क्रीडा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा  सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे. के.बेदरे  होते.तर प्रमुख उपस्थिती ॲड बालाजी भक्ते ,पवन लाकाळ, अजित कदम, राजलक्ष्मी काळे, किशोर काळे, संजय नाईकवाडी, सुरेंद्र राऊत, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी नाईकवाडी  ,जुनेद मोमीन हे उपस्थित होते .यावेळी प्राची  काळे, आलिशा  मोमीन,नवनाथ कानडे, साक्षी ढोबळे यांचासह  गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प्रमाणपत्र, ट्रॉफी,देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी .डी.कांबळे .यांनी केले तर आभार एस .एस.बळवंतराव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस.टी.कोळी .एल.टी.चव्हाण ,एस .एस.बळवंतराव  यांनी परिश्रम केले.               


 
Top