तेर (प्रतिनिधी)- मध्यस्थ कक्षामध्ये दोन्ही पक्षकारांनी समन्वय साधावा असे आवाहन दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर न्या .एस.डी.कामत यांनी केले.  धाराशिव तालुक्यातील तेर  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  यांच्या वतीने आयोजित विधी साक्षरता शिबिर प्रसंगी कामत अध्यक्षपदावरून बोलत होते.

यावेळी 

पुढे बोलताना न्या.कामत म्हणाले की, कुठलेही प्रकरण समन्वयाने  मिटविल्याने कोणाचाही जय पराजय होत नाही.त्यामुळे वेळ, पैसा वाचेल.दोंघाच्या संम्मतिने प्रकरण मिटल्यामुळे दोघांतील भविष्यातील संबंध चांगले रहातात, त्यामुळे लोकन्यायालय व मध्यस्थ कक्षामाफत जास्तीत जास्त प्रकरणे मिटविण्याचे आवाहनही न्या.कामत यांनी केले.

यावेळी उप मुख्य लोक अभिरक्षक ॲड.गोरख कस्पटे यांनी  हिंदू वारसा कायदा,1956 याबाबत मार्गदर्शन केले तर उप मुख्य अभिरक्षक ॲड.अभय पाथरूडकर यांनी बाल विवाह,2006 व पोटगी याबाबत मार्गदर्शन केले.तर सहाय्यक अभिरक्षक ॲड.शशांक गरड यांनी जेष्ठ नागरिक कायदा,2006 व जेष्ठ नागरिकासाठीच्या योजना याबाबत मार्गदर्शन केले.प्रास्ताविक धाराशिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर वसंत यादव यांनी केले.सूत्रसंचलन नवनाथ पांचाळ यांनी केले तर आभार तेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष गायकवाड यांनी मानले.यावेळी तेरणा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब वाघ, तेरच्या सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खोचरे, ॲड.श्रीकांत माळी,ॲड.अमोल रामदासी, अशपाक शेख,अशिष माळी,उमेश पेठे व नागरीक उपस्थित होते.        


 
Top