धाराशिव (प्रतिनिधी)-मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती देणारे मराठ्यांचे क्रांतीसुर्य स्व. आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनच्या वतीने धाराशिव-औसा रस्त्यावरील टेंभी येथे सोमवारी (दि.5) अभिवादन करण्यात आले.

अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या हस्ते अण्णासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अखिल भारतीय छावा संघटनेच्या जिल्हा संघटकपदी अमोल प्रभाकर गोरे, धाराशिव तालुका संघटकपदी रोहन कणसे, शेतकरी आघाडी धाराशिव तालुका कार्याध्यक्षपदी धनाजी आश्रुबा सलगर यांची निवड करुन नानासाहेब जावळे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके, धाराशिव शहर सचिव ज्योतीराम काळे, छावा पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top