धाराशिव (प्रतिनिधी)-पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रात , राजकारण, शिक्षण क्षेत्र  अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या  संगीता काळे यांची मुंबई येथे  देशाचे नेते खासदार शरद पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रांत अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.

संगीता काळे यांनी  यापूर्वी महिला दक्षता समिती सदस्य म्हणून पोलीस स्टेशन या ठिकाणी अनेक वर्ष काम केले आहे. इंडिया टीव्ही रिपोर्टर तसेच सक्षम न्यूज चैनल या माध्यमातून त्यांनी लोकांना न्याय देण्याचे काम केले आहे. सध्याच्या पक्ष फुटी नंतर ही निवडी पक्ष संघटनेसाठी महत्वपूर्ण मानली जात आहे. सर्व स्तरातून संगीता काळे  अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


 
Top