धाराशिव (प्रतिनिधी)-येथील लहुजी शक्ती सेनेकडून संगीता काळे यांचा लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विष्णू कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट ) या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव पदी निवड झाल्याबद्दल क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे चौकात भव्य सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश प्रवक्ता प्रा. डॉ.मारुती अभिमान लोंढे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष मोरे, विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तानाजी कांबळे, शहराध्यक्ष सुरज लोंढे, नितीन गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top