धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील सारोळा (बु) येथे शिवजन्मोत्सव सोहळा समितीची स्थापना दि.(1) फेब्रुवारी रोजी करण्यात आली. घेण्यात आलेल्या बैठकीत सर्व पादाधिकारी यांची एकमताने निवड करण्यात आली.
यामध्ये समितीच्या अध्यक्षपदी दादा गाढवे सचिव ऋषी बाकले कार्याध्यक्ष बाळासाहेब सुभाष रणदिवे सहकार्याध्यक्ष राहूल कापसे उपाध्यक्ष वैभव कोळगे, अजय मसे, अजय पाटील सदस्य पदी मुन्ना रणदिवे, व्यंकटेश मसे, कृष्णा कोळगे, अभिजीत रणदिवे, सौरभ चव्हाण, नितीन मसे, संदीप कोळगे, बबलू रणदिवे, धनंजय मसे, सुजित जाधव उपस्थित होते.