धाराशिव (प्रतिनिधी)-येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मंगळवार दि. 27 फेब्रुवारी, 2024 रोजी मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन मा. प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. 

 मराठी भाषा गौरव दिन हा कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरा केला जातो. मराठी भाषा संवर्धन, प्रचार आणि प्रसार या अनुषंगाने करण्याचा हा प्रयत्न असतो त्यासाठी  या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून धाराशिव येथील ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार रवींद्र केसकर हे मार्गदर्शन करणार आहेत. त्याबरोबरच या समारंभाचे अध्यक्ष म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष जीवनराव गोरे तसेच .प्राचार्य डॉ. रमेश दापके प्रमुख उपस्थिती म्हणून असणार आहेत.  अशी माहिती प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी दिली आहे.


 
Top