धाराशिव (प्रतिनिधी)-रूपामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाडोळी (आ)  येथे  स्वयंशासन दिन व 10 वी निरोप समारंभाचा कार्यक्रम उत्साहात साजरा.

 निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श केंद्रप्रमुख गिरी, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक मनसुळे हे होते. तसेच मुख्याध्यापक सूर्यवंशी, बनसोडे, उपस्थित होते.  इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गिरी यांनी अतिशय चांगले मार्गदर्शन केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी, 4500 रुपयाचे शालेय साहित्य दिले. हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी, अतिशय चांगले प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी रूपमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे  मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील शिक्षक वृंद, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


 
Top