भूम (प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची घटीका काही दिवसावर येऊन ठेपली आहे.  यामुळे काही व्यक्तींकडून पक्ष कार्यालयातून फोन आल्याचे सांगून चाचपणी केली जात आहे. हि प्रक्रिया पूर्णपणे बोगस आहे. धाराशिव मतदार संघ भारतीय जनता पक्षालाच सुटेल असा विश्वास व्यक्त करून प्रत्येकाने आजपर्यंत केलेल्या कामाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. तेव्हा सर्वांनी सतर्क रहावे असे आवाहन परंडा विधानसभा मतदारसंघाचे विस्तारक शिवाजी गिट्टे पाटिल यांनी बोलताना केले. .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 110 व्या भागाचे मन कि बात या कार्यक्रमाचे शहरात अनेक ठिकाणी आयोजन केले होते. यापैकी बूथ क्रमांक 256 मध्ये पक्षाचे तालुका प्रसिद्ध प्रमुख शंकर खामकर यांच्या निवासस्थानी मन की बात कार्यक्रम संपल्यानंतर लगेच तालुक्यातील सर्व सुपर वॉरिअरर्स, शक्ती केंद्र अध्यक्ष व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. 

यावेळी परंडा विधानसभा मतदारसंघाचे विस्तारक शिवाजी गीट्टे पाटील, तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहन जाधव, अंगद मुरूमकर, तालुका उपाध्यक्ष समाधान अंधारे, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, कामगार मोर्चा मराठवाडा प्रदेश सदस्य सचिन बारगजे, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, मारुती चोबे, चंद्रकांत गवळी, दादासाहेब मोरे, सुजित वेदपाठक, आदींची उपस्थिती होती.

या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. त्या अनुषंगाने पक्षाचे माजीमंत्री आ. राणाजगजितसिह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष संताजी पाटील,  विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर यांच्या आदेशानुसार तालुक्यातील सर्व सुपर वॉरियर, शक्ती केंद्र अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना अति महत्त्वाच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.


 
Top