तुळजापूर (प्रतिनिधी)-मराठा आरक्षण अंमलबजाबवणी व मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषनाच्या समर्थनार्थ तुळजापूर  बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आज सकल मराठा समाजाने शहरातुन रँली काढुन राजेशहाजी महाध्दार समोर मनोज जरांगे पाटलांनी प्रकृती स्वास्थ लाभू दे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवू दे व सरकारला मराठ्यांना आरक्षण देण्याची सदबुध्दी देवो असे महाआरती करुन श्रीतुळजाभवानी मातेस साकडे घालण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होते.

एकीकडे बंद सुरु असतानाच तुळजापूर येथील तरुणांने मागील तीन दिवसापासून आमरण उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे पंकज बोबडेचा आंदोलनाला समर्थन करण्यासाठी शहरातील महिलांनी आज छञपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात लाक्षणिक उपोषण केले. या पंकज बोबडेचा उपोषणाला माजी मंञी मधुकर चव्हाण यांनी भेट देवुन पाठींबा दिला. 


 
Top