परंडा (प्रतिनिधी) -  समाजातील व देशातील प्रश्न विद्यार्थ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे समाजामध्ये परिवर्तन होणे फार गरजेचे आहे. क्रांती विचाराने बनते. तेव्हा विचारांमध्ये परिवर्तन झाले पाहिजे. त्यासाठी वाचन केले पाहिजे. जीवन चरित्र वाचले पाहिजेत. समाजामध्ये उद्भवणाऱ्या प्रश्नांचा उलगडा झाला पाहिजे असे प्रतिपादन माजी राज्य संपर्क अधिकारी व विशेष कार्यकारी अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा.डॉ रामेश्वर कोठावळे यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात निरोप समारंभ प्रसंगी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना केले ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव, उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने, वरिष्ठ प्रा. डॉ. हरिश्चंद्र गायकवाड, प्रा.डॉ. डी. व्ही. शिंदे ,माजी पंचायत सभापती भीमराव शिंदे, लक्ष्मण सलगर, विविध सोसायटी चेअरमन श्रीकृष्ण शिंदे, माजी सरपंच रविराज गोपने, गुलचंद सोलंकर, माजी सरपंच शालेय समितीचे अध्यक्ष केरबा रणखांब, सिद्धार्थ विद्यालयाचे सहशिक्षक बिबीशन शिंदे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत गोपने, जिल्हा परिषद मुख्याध्यापक विलास जगताप यांची उपस्थिती होती.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. कृष्णा परभणे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये दिनांक 8 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या विविध उपक्रमांची रूपरेषा समोर मांडली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अमर गोरे पाटील, प्रा.डॉ. कृष्णा परभणे तसेच सह कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सचिन चव्हाण, प्रा. डॉ. अरुण खर्डे, प्रा. डॉ. सचिन साबळे, प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. 

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी शुभम फरतडे आणि कु.जेतवनी  मिसाळ यांनी आपली मनोगत व्यक्त केली. तसेच डॉ. डी. व्ही. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केला.यावेळी सर्व कार्यक्रमाधिकारी व सहकार्यक्रम अधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शिबिराच्या समारोप समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रा. गजेंद्र रंदील, प्रा.डॉ. संतोष काळे, प्रा. रंजीत वर्पे, प्रा. राजुरे, प्रा. व्ही. आर. नवले, प्रा. सावंत, प्रा. सौ. सातव यांची उपस्थिती होती. शिक्षकेत कर्मचारी उत्तम माने. हनुमंत कुठे. सुनंदा कोठुळे व अरुण माने यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रणजीत वर्पे यांनी केले. तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा सहकार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


 
Top