धाराशिव (प्रतिनिधी)-राज्यात 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारीपर्यत भाजपच्यावतीने गाव चलो अभियान राबविले जाणार असून, 50 हजार नेते जिल्ह्यात या अभियानामध्ये भाग घेणार आहेत. या अभियानामुळे सर्वांना एक प्रकारची उर्जा मिळेल असे मत भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदमध्ये व्यक्त केले. 

3 फेब्रुवारी रोजी दुपारी झालेल्या या पत्रकार परिषदेस अभियान प्रमुख ॲड. मिलिंद पाटील, माजी जि. प. अध्यक्ष नेताजी पाटील, माजी नगराध्यक्ष सुनिल काकडे, सतीश दंडनाईक उपस्थित होते. अधिक माहिती देताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्यात सर्वत्र हे अभियान राबविले जाणार असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह सर्व नेते सर्वत्र भाग घेणार आहेत. या अभियानांतर्गत नेते 24 तास संबंधित गावात थांबणार आहेत. यामध्ये लोकांच्या अडीअडचणी त्याचप्रमाणे मोदी सरकारने केलेले 10 वर्षातील कार्य हे आम्ही लोकांना सांगणार आहोत. ॲड. मिलिंद पाटील यांनी प्रत्येक बुथ, वार्ड, सर्कल याप्रमाणे 50 हजार नेते यात सहभागी होणार आहेत. 51 टक्के मते भाजपाला मिळविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता यात सहभागी होवून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचणार आहेत. जिल्ह्यात नळदुर्गला मिलिंद पाटील, धाराशिवला संताजी चालुक्य, कळंबला नितीन काळे, उमरगा दत्ता कुलकर्णी, जळकोट राणाजगजितसिंह पाटील याप्रमाणे नेतेसह कार्यकर्तेही 1200 ठिकाणी जाणार आहेत. 


 
Top