धाराशिव(प्रतिनिधी)- हातलाई शुगरच्या माध्यमातून या क्षेत्रातील शेतकऱ्यांचा उत्पन्नात वाढ तर होईलच पण त्यासोबत रोजगारची संधी या भागातील तरुणांना उपलब्ध होईल. आमच्या देशाबरोबर झालेल्या निर्यात करारामुळे या क्षेत्राला ऊर्जितवस्था प्राप्त होईल असे मत युगांडाच्या सहकारमंत्री नतबा हेरियट व्यक्त केले. 

कळंब तालुक्यातील जवळा (खुर्द) येथील हातलाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड या गूळ पावडर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम व मोळी पूजन सोहळा शिवजन्मोत्सव निमित्त युगांडा देशाच्या व्यापार सहकारमंत्री नतबाजी हेरियट व कोलंबियाचे व्यापार सल्लागार जी. मोहनराव व अजिंठा फार्मा लिमिटेड सल्लागार मधुसूदन अग्रवाल व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, हातलाई शुगरचे चेअरमन अभिराम पाटील सह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य सुधीर पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

 हातलाई शुगरचे चेअरमन युवा उद्योजक अभिराम पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी संजय पाटील, ॲड .व्यंकटराव गुंड, दत्ता कुलकर्णी, अनिल काळे, हणुमंत मडके, डॉ. राहुल पाटील, पियुष मळेकर, धनजंय शिंगाडे, संजय दुधगावकर, रवी दुधगावकर, किशोर सावंत, आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील, संस्था सदस्य आदित्य पाटील, डॉ.मंजुळाताई पाटील व ऊस उत्पादक शेतकरी, राजकीय व सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 
Top