धाराशिव (प्रतिनिधी)- येथे लहुजी शक्ती सेना या संघटनेकडून इंग्रजी विषयात राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) उत्तीर्ण झालेल्या श्रद्धा मस्के हिचा सत्कार लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश प्रवक्ता प्रा.डॉ. मारुती अभिमान लोंढे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 

यावेळी प्रा.डॉ. लोंढे म्हणाले की,विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली यांच्याकडून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) या देश पातळीवरील परीक्षेत इंग्रजी सारख्या कठीण विषयातून श्रद्धा मस्के या विद्यार्थिनीने घवघवीत यश संपादन करून समाजापुढे एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. ते पुढे म्हणाले की, श्रद्धा मस्के या मुलीचे आई वडील मजुरी करतात. मजुराची मुले देखील वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक होऊ शकतात. नेट सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. हे समाजाला दाखवून देण्याचे काम श्रद्धाने केले आहे त्याबद्दल श्रद्धाचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी श्रद्धाच्या आईचा देखील सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रा. डॉ. विकास भोवाळ, शहराध्यक्ष सुरज लोंढे यांच्यासह मोठ्या संख्येने लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top