धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील शिवशंभू पंढरी वसाहतीत छत्रपती शिवाजी महाराज 394 वी साजरी करण्यात आली.

प्रथम शिवरायांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून शिवरायांचे आठवावे रूप हे ध्येयमंत्र म्हणून त्यांच्या विचाराचे आचरण करण्यात यावे अशी प्रतिज्ञा करण्यात आली या प्रसंगी जेष्ठ नागरिक प्रा. श्यामराव दहिटणकर, सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यटन समिती चे कार्यध्यक्ष अभियंता रणजीत रणदिवे, प्रगती पतसंस्थेचे व्यवस्थापक मोहन सावंत,सौ. सुनिता दहिटणकर, सौ. सुदर्शना शेषनाथ वाघ , व्यंकटेश वाकुरे , अभाविप कार्यकर्ते अनिकेत सतिश कोळगे, चैतन्य पाटील, कृष्णा इंदापूरकर , अर्णव दहिटणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अभाविप एस.एफ.डी. चे प्रांत सदस्य सत्यहरी वाघ यांनी केले.   


 
Top