धाराशिव (प्रतिनिधी)- एका पोलीस कॉन्स्टेबलसह होमगार्डवर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला असुन, आरोपीनी आधी महिलेला कारवाईची भीती दाखवीत 10 हजार फोन पे वर घेतले व त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पिडीत महिला ऊसतोड मजूर आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 7 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भुम पोलीस ठाण्यातील कॉनस्टेबल दगडु सुदान भुरके व खासगी जीप चालक तथा होमगार्ड सागर चंद्रकांत माने या दोघांवर भुम पोलीस ठाण्यात कलम 376 (2) (अ) (i),323,384,34 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. ही घटना 2 फेब्रुवारी रोजी भुम बसस्थानक व आष्टावाडी शिवारात घडली. त्यानंतर 4 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद झाला.

पिडीत महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी असे नमूद केले आहे की, 2 फेब्रुवारी रोजी फिर्यादी व तिचा दीर हे दुपारी भूम येथुन बार्शीला जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना पोलीस कॉनस्टेबल दगडु सुदाम भुरके याने तुम्ही कोठुन आलात व कशासाठी थांबलात असे म्हणुन तुम्ही चोर दिसताय तुम्हाला पोलीस स्टेशनला घेवुन जातो म्हणून सागर माने याला जिप घेवुन बोलावले व त्यांना सोडुन देण्यासाठी फिर्यादीला 10 हजार रुपये देण्यासाठी सांगितले. फिर्यादीने ती कामाला असलेल्या मुकादमला माने याच्या खात्यावर फोन पे द्वारे पैसे पाठविण्यास सांगितले.

पैसे पाठविल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल दगडु सुदाम भुरके याने तुम्ही येथे बसस्टॅन्डवर थांबु नका, तुम्हाला पोलीस पकडतील म्हणून त्यादोघांना मोटारसायकलवर बसवुन आष्टावाडी येथे घेवुन गेला, तेथे आष्टावाडी येथे फिर्यादीचे दिराला सोडवुन फिर्यादीला तुम्हाला मॅडमने बोलवले आहे असे म्हणुन तिला मोटारसायकलवर बसवुन परत भूमकड़े नेले. भुमकडे येत असताना रस्त्याच्या कडेला मोटारसायकल थांबवून ज्वारीचे शेतात बळजबरीने नेहून तिचेवर बलात्कार केला व नंतर पुन्हा आष्टावाडी पाटी येथे सोडले. त्यानंतर तक्रार दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला, याचा तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि साबळे करीत आहेत. 
Top