तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नळदुर्ग बायपास उड्डाण पुलाच्या सर्विस रोडचे कच्चा रस्त्यावर हंगरगा शिवारात चार अज्ञातांनी कोयत्याचा धाक दाखवून  अत्यंविधीसाठी जाणारी  कार थांबवुन आतील महिलेच्या गळ्यातील सोने दागिने व रोख रक्कम एकुण 77 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शनिवार दि. 3 फेब्रुवारी रोजी  पहाटे 5.30 वाजता घडली. 

या बाबतीत शफीक युनुस शेख रा. धाराशिव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटल आहे, मी नातेवाईकासह फोर्ट फेस्टा कारने धाराशिव येथून हैदराबाद येथे त्याच्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात असताना चार अनोळखी इस्मानी फिर्यादीच्या फोर्ड फेस्ट कारला कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीचे पत्नीच्या गळ्यातील व हातातील वरील वर्णनाचा व किमतीचा सोन्याच्या दागिने जुने वापरते. तसेच फिर्यादीचे खिशातील दोन हजार रुपये असा एकूण 77 हजार रुपयाचा जबरीने चोरून नेला अशा दिलेल्या फिर्याद वरुन तुळजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात  गुरंन 40/24 कलम 341,392,34 भादंवी अन्वय गुन्हा दाखल झाला आहे.


 
Top