तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद पेठ  प्रशालेत बाल आनंद मेळावा व माता पालकांचा मेळावा संपन्न झाला.         

कार्यक्रमाच्या उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन देवकते यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रमाकांत लकडे, गंगाराम झिंजे, चंद्रकांत कोळपे, शिवाजी जाधव, पुष्पा झिंजे, प्रमिला आगलावे, मनीषा कोकरे,वैष्णवी पाडुळे, माधवी लकडे यांची उपस्थित होती. यावेळी विद्यार्थ्यांनी  100 स्टॉल उभारले होते. ग्रामस्थांनी या स्टॉलवरून विविध प्रकारच्या वस्तू खरेदी केल्या. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे हा यामागील हेतू होता. तसेच मकर संक्रातीनिमित्त माता पालकांना हळदी कुंकू व भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सुलभा पवार, सहशिक्षक उषा नाईक, वर्षा शेजाळ,रोहीणी हलसीकर, शकुंतला पांचाळ, लता बंडगर, गणपती यरकळ, चंद्रकांत गिरे, गोरख चौरे, संतोष देशपांडे यांनी परिश्रम घेतले.


 
Top